Header Ads

फायदेशीर कडकनाथ कोंबड्या


फायदेशीर कडकनाथ कोंबड्या

कडकनाथ कोंबड्यांतील औषधी गुणधर्मामुळे त्यांच्या अंडी व मांसाला चांगली मागणी व भाव आहे. कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता अतिशय चांगली असल्यामुळे या कोंबड्यांच्या खाद्यावर व व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.
कडकनाथ कोंबड्या उंच व काळ्या रंगाच्या असून, त्यांची कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता अतिशय चांगली आहे. या कोंबड्या मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्ह्यामध्ये अाढळतात. या कोंबडीचे मांस रंगाने काळे असून, चविष्ट व औषधी आहे. गावरान कोंबड्यासोबत कडकनाथ कोंबड्याचे संगोपन करता येते.
अाैषधी गुणधर्म
- कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असून, कोलेस्टेराॅलचे प्रमाण अतिशय कमी अाहे. त्यामुळे हृदय रोग असलेल्यांना कडकनाथ कोंबडीचे मांस उपयुक्त अाहे.
- या पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय चांगली असून, कोंबडीचे मांस चविष्ट असते.
- कडकनाथ पक्ष्यांची अंडी व मांस उच्च रक्तदाब, डोकेदुखी, दमा व मूत्रपिंडाची सूज, कॅन्सर, नपुंसकता इ. रोगावर गुणकारी अाहे.
- मांस व अंड्यामध्ये आवश्‍यक अशा अमिनो आम्लाचे प्रमाण, संप्रेरके, जीवनसत्त्व ब१, ब२, ब६, ब१२ आणि ई, नायासिन, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह यांचे प्रमाण भरपूर असते.
अ. क्र. ---गुणधर्म---कडकनाथ कोंबडी---सामान्य कोंबडी
१---प्रथिने (टक्‍के)---२५---१८-२०
२---स्निग्ध पदार्थ (टक्‍के)---०.७३ -१.०३---१३-२५
३---लिनिओलिक आम्ल (टक्‍के)---२४---२१
४---कोलेस्टेरॉल (मि.ग्रॅ./१०० ग्रॅम)---१८४.७५---२१८.१२


No comments:

Powered by Blogger.